मेष- चंद्र आज 19 फेब्रुवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभ भावात असेल. आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल.
व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचे यशस्वी नियोजन करू शकाल. दुपार नंतर मात्र मानसिक एकाग्रता होणार नाही. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.
वृषभ- आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. व्यापार – व्यवसायात यश मिळवू शकाल. आपल्या कामगिरीचे कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर खुश होतील. दुपार नंतर नवीन कामाचे यशस्वी नियोजन करू शकाल. व्यापारात फायदा होईल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल.
मिथुन- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्याने आपणास मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपार नंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल होईल. वडीलधार्यांच्या आशीर्वादाने तुमचे कार्य तडीला जाईल.
कर्क- आज मन अशांत व निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्ये व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपार नंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्याने मनःस्वास्थ्य मिळेल. आनंदप्राप्तीसाठी खर्च होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल.
सिंह- आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र व स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र अती विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळे कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति हाताळू शकाल.
कन्या- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. भावनेच्या भरात आपण वाहवत जाण्याची शक्यता आहे. दुपार नंतर दिवस आनंदात जाईल.
तूळ-आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. आज शक्यतो प्रवास टाळावा. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता आहे. दुपार नंतर कामे यशस्वी झाल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आज यश व कीर्ती प्राप्त होईल. व्यवसायात चांगले सहकार्य लाभेल.
वृश्चिक- आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटतील. आज नवीन वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने ह्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना सहजपणे राबवू शकाल. दुपार नंतर वैचारिक स्थैर्य राहणार नाही.
धनु- आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मित्र व स्वकीयांसह वेळेचा सदुपयोग आनंददायी वातावरणात करू शकाल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक दृष्टया आपण बेचैन राहाल. सौंदर्य प्रासधने, गृहसजावट व मनोरंजनाची साधने खरेदी करू शकाल.
मकर- आज वाद होण्याची शक्यता आहे. आज एखाद्या धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपार नंतर मन प्रफुल्लित राहील. शारीरिक स्वास्थ्य मिळेल. नशिबाची साथ मिळेल. एखादा प्रवास संभवतो.
कुंभ- आज आपले मन आनंदी राहील. मनात नकारात्मक विचार येतील. आपल्या कृती संयमित ठेवाव्या लागतील. अचानकपणे खर्च उदभवतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. आपण केलेल्या कामाकडे कोणी लक्ष न दिल्याने आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे.
मीन- आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. आज वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 19-02-2026












