कोकणातील सहकारी संस्थांची चौकशी करा! कर्जमाफी योजनेत पारदर्शकतेसाठी दीपक मोहिते यांची मागणी

खेड: खेड तालुक्यातील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी संस्थांच्या कारभाराबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक मोहिते यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. कर्जवाटप प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने, आगामी कर्जमाफी योजनेचा लाभ केवळ खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच मिळावा, असा या मागणीचा उद्देश आहे.

मोहिते यांच्या मते, सरकारने कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांची काटेकोर छाननी करावी, अन्यथा अपात्र व्यक्तींना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्याची विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:09 19-02-2026

Ratnagiri Khabardar add image