रत्नागिरी जिल्ह्यात आरटीई (RTE) प्रवेशाचे बिगुल वाजले! ९२ शाळांमध्ये ८०२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

रत्नागिरी: जिल्ह्यातील वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारी २०२६ पासून अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.

महत्त्वाचे तपशील:

  • एकूण पात्र शाळा: ९२
  • उपलब्ध जागा: ८०२
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत: १० मार्च २०२६
  • पात्रता: ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ते या योजनेसाठी पात्र आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 19-02-2026