परदेशात शिवजयंती साजरी करणे हे प्रेरणादायी : ॲड. सौ. जया उदय सामंत

मराठी माणूस देशात असुदे की परदेशात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विसरुच शकत नाही. स्वराज्य स्थापन करून गरीब जनतेची सेवा करणारा जगप्रसिद्ध राजा अशी ख्याती असणाऱ्या श्रीमंत छत्रपतींची जयंती आखातामधील यूएई मध्ये दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी करण्यात आली. या भव्य आयोजनाचे हे ८ व वर्ष होते व दुबईतील ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूल याठिकाणी करण्यात आले.
आयोजकांच्या धाडसी प्रयत्नाला मनंपुर्वक शुभेच्छा देण्यासाठी यंदाच्या प्रमुख पाहुण्या ऍड सौ जया उदय सामंत खास महाराष्ट्रातून उपस्थित होत्या. उपस्थित मराठी Diaspora ला त्यांनी संबोधित करत त्यांचे व सर्व कलाकारांचे कौतुक केले.
आखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदीप्यमान ईतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्राची लोककला,लेझीम यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आले.श्रीमंत ढोल ताशा पथक यूएई च्या सहकार्यानी भव्य असे ढोल ताशा वादन करण्यात आले.
महाराष्ट्रातील २०हून अधिक कोकणी कलाकार या सादरीकरणात सामील झाले. “दुबई सारख्या परदेशात स्थायिक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास, त्यांनी दिलेली मूल्ये आपल्या नवीन पिढीपर्यंत पोचवण्याचे मोलाचे कर्तव्य तुम्ही बजावत आहात. आपली भाषा, आपली संस्कृती, आपला मराठी बाणा आणि आपल्या देशाप्रती प्रेम आणि त्यांचा अभिमान असेच जगभर पसरत राहो.” या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार व्यक्त केले.
युएईतील १००० हुन अधिक मराठी व आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला व कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
वरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक, चंद्रशेखर जाधव,चैताली जाधव व इतर सर्व सहकार्यांनी अथक मेहनत घेऊन भव्य शिवजयंती साजरी केली व अटकेपार झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला.. या कार्यक्रमास दुबईतील उद्योजक व समाजसेवी संघटनांनी सहकार्य केले.