रत्नागिरी : विधानसभा निवडणुक – उमेदवारांच्या खर्चमर्यादेत १२ लाखाने वाढ

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा १२ लाखांने वाढवून ४० लाख केली आहे.

हा निवडणूक आयोगाचा उमेदवारांना दिलासाच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी खर्चमर्यादा २८ लाखांपर्यंत होती तसेच निवडणुकीवेळी होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी खर्चाची आचारसंहिता घालून दिली आहे.

निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यापासून प्रत्येक बाबीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा हिशेब उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. एवढेच नव्हे, तर प्रचारासाठी वापरणाऱ्या गाड्यांसाठीही निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारासाठी खर्चमर्यादा २८ लाख होती. ती वाढवल्यामुळे उमेदवारांना प्रचार यंत्रणा अधिक गतिमान आणि आधुनिक रूपात राबवता येणार आहे तसेच प्रचारामध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची परवानगी उमेदवाराला घ्यावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा १२ लाख रुपयांनी वाढवली आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला अर्ज दाखल केल्यापासून होणाऱ्या विविध बाबींवरील खर्च सादर करणे बंधनकारक आहे. – जीवन देसाई, निवडणूक निर्णय अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 30-10-2024