संपर्क युनिक फाउंडेशन व आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची दखल समाजाने घेणे गरजेचे : डॉ. जयप्रकाश रामानंद

रत्नागिरी : समाजामधील अडीअडचणी सोडविण्यासाठी कटीबद्ध असलेली आणि विशेषतः गोरगरीब रुग्णांना योग्य मार्गदर्शन, मदत अविरतपणे काम करणारी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना जे कार्य या दोन संस्था करीत आहेत ते वाखाणण्याजोगी आहेत, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी गेली सात वर्षे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात आपल्या रुग्ण मदत केंद्र मार्फत अविरतपणे विनामूल्य सेवा देत असून जिल्ह्यातील येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळत आहे, रुग्ण आणि डॉक्टर यांचेतील दुवा म्हणून ही संस्था खुपच चांगले कार्य करीत असून या मदत केंद्र येथे कोऑर्डिनेटर सौ निकीता जनार्दन कांबळे यांच्या कार्याबद्दल डॉ रामानंद यांनी गौरवोद्गार काढले. तसेच आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना ही अतिशय मोलाची कामगिरी करीत असून ज्येष्ठ नागरिक यांना या संस्थेने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

यावेळी डॉ कुमरे यांनी ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध आजारांबाबत माहिती दिली आणि योग्य ते उपचार कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.प्रारंभी आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव अहमद मालवणकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी संस्थेच्या कामाचा अहवाल सादर केला. आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक सुहेल मुकादम यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली. मुंबई येथील संस्थेचे प्रमुख फिरोज कोंडकरी यानी पाठवलेले दिलावर कोंडकरी यांच्या प्रती भावना व्यक्त करणारे पत्र वाचून दाखविण्यात आले. कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी इम्तियाज बिजापुरी यांनी 40 ब्लॅंकेट संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला भेट दिली असून ही ब्लॅंकेट गोरगरीब तसेच अनाथाश्रम अशा ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून देण्यात येतील शिवाय संस्थेच्या कामकाजात गती येण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गजेंद्र कृपाल यांनी आर्थिक मदत म्हणून रू 10000/- रक्कम देण्याचे जाहीर केले.

यावेळी सेवानिवृत्त बॅंक अधिकारी जे पी बिवलकर हे मोडी लिपी वाचन करून जनतेच्या मोडीलिपीचे भाषांतर करून देतात तसेच वीज ग्राहकांच्या विविध तक्रारींचे निवारण विनामूल्य सेवा देत आहेत. त्यांना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण बाबत सातत्याने कार्य करणारे आणि झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबविणारे गजेंद्र कृपाल यांचा ही सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष, पत्रकार राजेश शेळके यांना ही सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कणकवली येथे सातत्याने सामाजिक कार्य करीत असणारे, गोरगरिबांना मदत करणारे हाजी इम्तियाज बिजापुरी यांना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ सांगविकर, डॉ कुमरे यांना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी सैनिक, उत्कृष्ट जलतरणपटू शंकरराव मिलके यांना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील इचलकरंजी येथील युसरा फाउंडेशन ला सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार युसरा फाउंडेशन चे संस्थापक मोमीन बालम यांनी स्वीकारला. तसेच दहीहंडीच्या उत्सवात सातव्या थरावर चढून सलामी देणारी पाच वर्षे वयाच्या अन्वी दीपक कोळगे हिने संपूर्ण कोकणात इतिहास घडवला त्याबद्दल तिला ही सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक हाजी अ.रहिमान बिजापुरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे वतीने सामाजिक कार्यकर्ते सुहेल मुकादम यांना सन्मानपत्र देण्यात आले व त्यांचा सन्मान करण्यात आला.

Mahrashi karve ANM

यावेळी मरहुम दिलावर कोंडकरी यांचे पुत्र आयान कोंडकरी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक, दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनजीओ चे उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 21-12-2024