साडवली : आंगवलीतील श्री मार्लेश्वर देवस्थानचा यात्रोत्सव सोहळा १२ व १३ जानेवारीला विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. जानेवारीत होणाऱ्या श्री देव मार्लेश्वराच्या विवाहाचे वेध सगळ्यांना लागले असून, त्याची तयारी सुरू झाली आहे.
१२ जानेवारीला सकाळी १० वा. वरद शंकराची पूजा, दुपारी ३.४५ वा. ध्वजवंदन, सायं. ४ ते ६ श्री मार्लेश्वर देवदेवतांना हळद लावण्यात येईल. ६ ते ८ या वेळेत खेळ पैठणीचा, ७ वा. दीपोत्सव, रात्री ८ ते ९ महाप्रसाद, ९ वा. “गर्जा महाराष्ट्र माझा” हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. १३ ला दुपारी ३ वाजल्यांपासून विविध मानांच्या पालख्या, दिंड्यांचे आंगवली येथील श्री मार्लेश्वर मंदिरात आगमन होईल. सायं. ५.३० ते ७.३० या वेळेत खेळ पैठणीचा भाग-२ आयोजित करण्यात आला आहे. ७.३० ते ९ या वेळेत श्री देव मार्लेश्वर विवाह सोहळ्यात जाण्यापूर्वीचे सर्व विधी मंदिरात होतील. ११.३० वा. श्री देव मार्लेश्वर, गिरिजादेवी यांच्या कल्याणविधी सोहळ्यासाठी पालख्या, दिंड्यांचे शिखराकडे प्रयाण होईल. सलग दोन दिवस आयोजित सर्व कार्यक्रमांत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट आंगवली, ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 21/Dec/2024