maharashtra Dam Water Storage : राज्यात सद्यस्थितीत पाणी संचय करण्यात येणाऱ्या लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे ३०२८ इतकी धरणे असून यावर्षीच्या २३ मे २०२६ अखेर या सर्व धरणांमध्ये सुमारे ३०.८८ टक्के (४४५.४१४ टी.एम.सी) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जल सिंचन तज्ञ इंजि.हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे.
त्याचबरोबर गतवर्षी म्हणजेच २३ मे २०२५ रोजी राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा हा अंदाजे २७.८५ टक्के म्हणजेच ४०१.७०९ टी.एम.सी. इतका होता, मात्र यावर्षी सुमारे ४३.०३ टक्के (४३.७०५ टी.एम.सी.) इतका उपयुक्त पाणीसाठा अधिक आहे. राज्यात सहा महसुली विभागातील उपयुक्त पाणीसाठ्याची स्थिती कशी आहे, ते पाहुयात….
- कोकण विभागात एकूण १७३ धरणे असून आजमितीस सुमारे ४६.७८४ टी.एम.सी (३५.७६ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
- नाशिक विभागात ५३९ इतकी लहान,मध्यम व मोठी धरणे असून त्यामध्ये आजमितीस ६५.६७६ टी.एम.सी.(३१.२३ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
- पुणे विभागात एकूण ७२४ धरणे असून आज ११९.०७१ टी.एम.सी (२२.१० टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
- छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागामध्ये एकूण 929 धरणे असून त्यामध्ये आज सुमारे ८८.३७० टी.एम.सी. (३४.३४ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे .
- अमरावती विभागामध्ये २७६ धरणे असून त्यामध्ये ५९.०२९ टी.एम.सी. (४२.५७ टक्के) इतका पाणीसाठा आहे.
- नागपूर विभागात ३८७ धरणे असून या धरणांमध्ये ६६.४७६ टी.एम.सी (३९.८९ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
- सर्वात जास्त पाणीसाठा हा अमरावती विभागात (४२.५७) आणि त्या खालोखाल नागपूर विभागात (३९.८९ टक्के) असून सर्वात कमी पाणीसाठा पुणे विभागात (२२.१० टक्के) असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील प्रमुख मोठ्या तीन धरणांमध्ये २३ मे २०२६ रोजी शिल्लक असलेला उपयुक्त पाणीसाठा
- उजनी धरण– (उणे-) ९.२० टी.एम.सी.(उणे-) १७..१७ टक्के
- कोयना — १३.६९ टी.एम.सी (१३.५९ टक्के)
- जायकवाडी — २९.१९३ टी.एम.सी (३८.०८ टक्के)
नाशिक- पुण्याचा पाणीसाठा
या वर्षी पुणे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खडकवासला धरणसमुहाचा उपयुक्त पाणीसाठा सुमारे २४.८५ टी.एम.सी. असुन गतवर्षीच्या उपयुक्त पाणी साठ्यापेक्षा तो अंदाजे (१.२४ टीएमसी) ४.२६ टक्क्यांनी अधिक आहे. नाशिक जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा सुमारे २८.७५ टक्के इतका असून गतवर्षीपेक्षा तो ३.८० क्के जास्त आहे. तसेच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सुमारे २.२८२ टीएमसी (४०.५३ टक्के) व दारणा धरणात सुमारे १.३९१ टीएमसी (१९.४६ टक्के) कडवा धरणात ०.३९९ टी.एम.सी (२३.६४ टक्के) इतका उपयुक्त पाण्यासाठा शिल्लक आहे.
जायकवाडीच्या पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले…
महत्त्वाचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागासाठी (मराठवाडा) व अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पातील बाष्पीभवनाचे प्रमाण दररोज अंदाजे ८० द.ल.घ.फु. इतके नोंदवले जात असून या पुढील कालावधीमध्ये बाष्पीभवन व्हायचे प्रमाण अधिक वाढू शकते. त्यानुसार दर महिन्याला अंदाजे २.५०० टी.एम.सी. इतका बाष्पीभवन व्यय ( Evaporation losses) होऊ शकतो.
विशेष म्हणजे ०१ जुलै २०२५ ते २३ मे २०२६ अखेरपर्यंत जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यामधुन अंदाजे ११.५८ टी.एम.सी.(११.२७ टक्के) इतका बाष्पीभवन व्यय (Evaporation losses) झालेला दिसून येत आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत म्हणजे साधारणत: ३१ ऑगस्ट २०२६ अखेर पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे फार गरजेचे ठरणार असल्याचे देखील चकोर यांनी सांगितले.
राज्यातील काही महत्त्वाच्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा
कोकण विभाग
- सुर्या धरण –2.977 टीएमसी (30.50%)
- मध्य वैतरणा –1.743 टीएमसी (25.51%)
- डोलवहाळ धरण –0.213 टीएमसी (92.62%)
- भातसा धरण –12.532 टीएमसी(37.67%)
- बारावी धरण –3.956 टीएमसी (33.06%)
- मोडकसागर –3.174 टीएमसी (51.42%)
- तानसा –1.715 टीएमसी (28.15%)
- तिलारी –5.134 टीएमसी (32.50%)
- नागपूर विभाग
- गोसी खुर्द–10.580 टीएमसी (40.48%)
- पेंच प्रकल्प –18.430 टीएमसी (51.32%)
- असोलामेंढा–1.143 टीएमसी (43.00%)
- दिना धरण —1.232 टीएमसी (40.11%)
- इटियाडोह–2.805 टीएमसी (24.99%)
- निम्न वर्धा —3.694 टीएमसी (48.23%)
- काटेपुर्णा–0.848 टीएमसी (27.84%)
- उर्ध्व वर्धा –9.268 टीएमसी (46.53%)
- खडकपुर्णा–0.00%
- अरुणावती—2.487 टीएमसी (41.52%)
- नाशिक विभाग (जळगाव जिल्हा)
- गिरणा धरण –6.922 टीएमसी (37.44%)
- हतनूर धरण –1.994 टीएमसी (22.14%)
- वाघुर धरण —6.000 टीएमसी (68.44%)
- मराठवाडा (छ.संभाजीनगर विभाग)
- माजलगाव —3.235 टीएमसी (29.42%)
- मांजरा धरण –1.639 टीएमसी (26.23%)
- येलदरी —15.892 टीएमसी (5557%)
- विष्णुपुरी — 1.489 टीएमसी (52.20%)
- निम्न तेरणा —1.497 टीएमसी (46.46%)
- सीना कोळेगाव–00.000 टीएमसी (00%)
- शिवनी—0.29 टीएमसी (8.29%)
- निम्न दुधना –3.515 टीएमसी (36.85%)
- पुणे विभाग
- खडकवासला — 1.130 टीएमसी (57.47%)
- पानशेत —3.210 टीएमसी (30.12%)
- डिंभे –1.880 टीएमसी (15.04%)
- चासकमान –00.960 टीएमसी (12.69%)
- भाटघर —1.870 टीएमसी (7.98%)
- वारणा —7.850 टीएमसी ( 28.53%)
- धोम —2.880 टीएमसी (24.65%)
- वीर—-5.180 टीएमसी (55.08%)
- दुधगंगा —2.600 टीएमसी (10.84%)
- राधानगरी —-2.377 टीएमसी (30.56%)
- मुळशी —5.030 टीएमसी (24.97%)
- पवना —2.460 टीएमसी (28.93%)
- राज्यातील तीन प्रमुख मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा खालीलप्रमाणे
- जायकवाडी– २९.१९३ टीएमसी (३८.०८ टक्के)
- गतवर्षी– २२.६०४ टीएमसी (२९.४८ टक्के)
- कोयना — १३.६९० टीएमसी /(१३.५९ टक्के)
- उजनी—(-) ९.२०० मृतसाठा टीएमसी)/(-) १७.१७ टक्के)
- जायकवाडी धरणातील पाणीसाठा ०१ मेपासून ते २३ मे २०२६ पर्यंत अंदाजे चार(७.२८० टी.एम.सी.) टी.एम.सी.ने कमी झाला असून देखील तो गतवर्षीपेक्षा ८.६० टक्के (६.५८८ टीएमसी) जास्त आहे, ही जमेची बाजू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 23-05-2026














