आबलोली : स्वरचैतन्य ग्रुप, आबलोली तर्फे दिवाळी पहाट,रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, कौस्तुभ सुतार यांचे शिल्प प्रात्याक्षिक आणि अभिजात मराठी भाषेचा गौरवशाली वारसा या विषयावर प्राध्यापक अमोल पवार यांची मुलाखत अशा भरगच्च कार्यक्रमांनी कला रसिक मंत्रमुग्ध झाले.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वासुदेव पांचाळ यांचे निवासस्थान, साई माऊली गॅरेजच्या शेजारी, पांचाळवाडी येथे पार पडलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक गितेश पांचाळ, गौतमी वाडेकर, अक्षय सुतार, पखवाज वादक संदेश पांचाळ, तबलावादक उमेश पांचाळ, हार्मोनियम गिरीश पांचाळ, टाळ वादक शुभम पांचाळ आणि निवेदक प्रतीक्षा पांचाळ यांनी बहारदार मैफिल रंगवली. बाल गायक नुरवी पांचाळ, सर्वज्ञा पांचाळ, स्वरा पेढे, यश डिंगणकर यांनीही आपली गीते सादर करून उपस्थित कलारसिकांची वाहवा मिळवली. दिवाळी पहाटचे हे सातवे वर्ष होते.
दिवाळीचे औचित्य साधून ‘स्वरचैतन्य रंगत कलांची-संगत सुरांची’या भावनेने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अर्पिता साळवी, रामपूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आयोजकांच्या वतीने विजेत्यांना व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र, भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. शिल्पकलाकार कौस्तुभ सुतार यांनी शिल्प प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी सदानंद पांचाळ यांचे हुबेहूब मूर्ती चित्र तयार केले आणि रसिकांची उस्फूर्त दाद मिळवली. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे औचित्य साधून ‘अभिजात मराठीचा गौरवशाली वारसा’ या विषयावर वझे केळकर महाविद्यालय मुलुंड चे प्राध्यापक अमोल पवार यांच्याशी निवेदक वैष्णवी पांचाळ यांनी संवाद साधला. या मुलाखतीत मराठी भाषेची थोरवी, प्राचीन परंपरा, अभिजात भाषेचे निकष, भाषेच्या उत्कर्षासाठी आपण करायचे प्रयत्न आदी विविध विषयांवर प्राध्यापक अमोल पवार यांनी आपले विचार व्यक्त केले. या संवादात्मक मुलाखतीच्या कार्यक्रमात उपस्थित रसिकांनी सहभाग घेत विचारांचे आदान प्रदान केले.
या सर्व उपक्रमांना मोठ्या प्रमाणात कलारसिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदानंद पांचाळ, वासुदेव पांचाळ, गणपत पांचाळ, श्रीकांत पांचाळ, विनायक सुर्वे, संदेश पांचाळ, गिरीश पांचाळ, गितेश पांचाळ, गौरव पांचाळ,पंकज पांचाळ, प्रतीक्षा पांचाळ, वैष्णवी पांचाळ, सान्वी पांचाळ, वृषाली पांचाळ यांनी विशेष प्रयत्न केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 04/Nov/2024