मयुरी पाटील यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; रिक्त जागेवर कोणाची लागणार वर्णी?
रत्नागिरी:
ZP Engineer Transfer प्रक्रियेतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख आणि कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांची कोल्हापूर येथील जीवन प्राधिकरण विभागात बदली करण्यात आली आहे. पाटील यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेतील आपला ३ वर्षांचा विहित कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर हा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या पदावर अद्याप कोणत्याही नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण अन् कोल्हापूरला नवी नियुक्ती
मयुरी पाटील या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी या पदावरील आपला ३ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शासकीय नियमांनुसार त्यांची बदली आता कोल्हापूर येथील जीवन प्राधिकरण विभागात करण्यात आली असून त्या तिथे आपली नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत.
रिक्त जागेबाबत संभ्रम; प्रभारी की पूर्णवेळ अधिकारी?
कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांची बदली झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील हे मुख्य पद आता रिक्त झाले असून या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. ग्रामीण भागातील पाणी योजनांच्या दृष्टीने हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी शासनाकडून नवीन पूर्णवेळ अधिकारी पाठवला जाणार, की जिल्हा परिषदेतीलच एखाद्या सक्षम अधिकाऱ्याकडे या पदाचा अतिरिक्त प्रभारी कार्यभार सोपवला जाणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 08-07-2026














