विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीची जबाबदारी कोणी घ्यायची? शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची अमित ठाकरेंची आक्रमक मागणी
मुंबई: Amit Thackeray On Sonam Wangchuk Protest (अमित ठाकरे यांची सोनम वांगचुक आंदोलनावर प्रतिक्रिया) संदर्भात केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर आणि तीन मुख्य मागण्या मान्य झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले, तरी मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. “सरकारने तीन मागण्या मान्य केल्याबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन, पण जर हे आधीच केले असते तर या सगळ्या उपोषणाची आणि आंदोलनाची गरजच भासली नसती,” असे अमित ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
“मुलींचे कपडे फाडले, मुलांना मारहाण केली; जबाबदारी कोणाची?” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. ते म्हणाले, “आज आंदोलनादरम्यान मुलींचे कपडे फाडले गेले, मुलांना खिळे ठोकून मारहाण करण्यात आली, या भयानक प्रकाराची जबाबदारी सरकारमधील कोण घेणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत विद्यार्थी समाधानी आणि सुरक्षित नाहीत, तोपर्यंत मनसे त्यांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरेल आणि विद्यार्थ्यांवर कोणालाही हात उचलू देणार नाही. “ही विद्यार्थ्यांच्या हक्काची लढाई आहे आणि आम्ही संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी आहोत. जेव्हा विद्यार्थ्यांना समाधान वाटेल तेव्हाच ही लढाई खऱ्या अर्थाने संपेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच, जोपर्यंत विद्यार्थी रस्त्यावर उतरून न्याय मागत आहेत, तोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
“हे लोकांचे स्वयंस्फूर्त आंदोलन, सरकार बॅकफूटवर” हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून देशातील सामान्य नागरिक आणि विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरले आहेत. जनतेच्या या तीव्र आक्रोशा मुळेच आज सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे आणि मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत, असा दावाही अमित ठाकरे यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 24-07-2026














