गावखडी येथे समुद्रात आढळला वृद्धेचा मृतदेह

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी जेट्टी जवळ समुद्रात बुधवारी सकाळी ८.३० वा. सुमारास वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला.

याबाबत प्रमिला महादेव नागवेकर (७१, रा. गावखडी भंडारवाडी, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत संजय सदाशिव पाटील (६३, रा. गावखडी भंडारवाडी, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली.

त्यानुसार, प्रमिला नागवेकर यांचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. मंगळवार रोजी दुपारी २ वा. सुमारास त्या घरातून निघून गेल्या होत्या. त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत असताना बुधवारी सकाळी ८.३० वा. सुमारास गावखडी जेट्टीपासून सुमारे ५० मीटर अंतरावर समुद्रात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पूर्णगड पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 07-11-2024