उबाठा गटाला भगदाड; माजी विभाग प्रमुख शशिकांत अलीम, शाखा प्रमुख मेहबूब पटेल यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

◼️ परटवणे प्रभाग क्रमांक १ मधील उबाठा गटातील पदाधिकारी, युवकांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील परटवने प्रभाग क्रमांक १ मधील उबाठा गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी माजी विभाग प्रमुख शशिकांत अलीम, शाखा प्रमुख मेहबूब पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज स्वीकारला.

या प्रसंगी बोलताना शशिकांत अलीम यांनी सांगितले की, शिवसेनेच्या जनसेवेच्या कार्यामुळे आणि मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सांगितलं.

मंत्री उदय सामंत यांनी या नव्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी राजेंद्र क्षीरसागर, अथर्व शिंदे, सक्षम गुरव, मनोज शितप, प्रशांत पवार, मैनुद्दीन मदार, अशफाक मदार, मेहबूब शेख, तेजस नटे, अक्षय शिंदे, मंथन कुरटे, स्वप्नील अली, स्वरूप कुवार, अदित्य अलीम, शीवा तांबे, राज देवरुखकर, शुभम सावंत देसाई, सुरज शिंदे, सुयोग धुळप, सुमित धुळप, स्वप्नील जाधव अनिकेत कीरसागर, अनिकेत किरसागर, संकेत कीरसागर, आदीत्य रसाळ, यश शिंदे, प्रणव रजपूत, गौरव रजा रजपूत, अभम बाबुल, सोयल मदार, सोयल मुल्ला, आसिफ करणे, संजोग शितप, मयुरेश पांचाळ, प्रजवल देवरुखकर, रोहन शिवगण, प्रेम शिगवण, साहिल पवार, हर्षल धूळप यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे रत्नागिरी शहरात उबाठा गटाला भगदाड पडले असून, शिवसेनेची ताकत वाढली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 08-11-2024