देवरुख येथे ५ व ६ ऑक्टोबरला पितांबरी चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित पितांबरी चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ दिनांक ५ व ६ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केली आहे. ही स्पर्धा चिंतामणी मंगल कार्यालय, मधली आळी, देवरुख (संगमेश्वर) येथे होईल.

या स्पर्धेत पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट असे सहा गट असतील. या वर्षातील ही चौथी स्पर्धा आहे. जे खेळाडू यावर्षी कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही त्या खेळाडूंनी २०२४-२५ या वर्षाचे नोंदणी शुल्क ५० रुपये जिल्हा असोसिएशनकडे जमा करावेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये दुहेरीसाठी २०० रुपये व लहान गटासाठी १०० रुपये याप्रमाणे असेल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे, अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात.

स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. मागावून कोणतीही तक्रार एकून घेतली जाणार नाही. या स्पर्धेत पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत याची सर्व स्पर्धकांनी नोंद घावी. या स्पर्धेतील महत्त्वाचे सामने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनकडून युट्युब चैनल वर लाईव्ह दाखवले जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून मंदार दळवी व सागर कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून मोहन हजारे हे काम पाहतील. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे तसेच रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:10 PM 24/Sep/2024