Maharashtra Bank Holidays October 2026: ऑक्टोबर महिन्यात बँकांना १६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात तब्बल ८ दिवस बँका बंद राहणार

Maharashtra Bank Holidays October 2026: ऑक्टोबर महिन्यात बँकांना १६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात तब्बल ८ दिवस बँका बंद राहणार

ऑक्टोबर २०२६ मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर; प्रवासाआधी तपासा आरबीआयचे कॅलेंडर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्रसिद्ध केलेल्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार ऑक्टोबर २०२६ या महिन्यात विविध सण-उत्सव, प्रादेशिक जयंती आणि नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळे देशभरातील बँकांना वेगवेगळ्या दिवशी एकूण १६ दिवसांची सुट्टी असणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील बँक ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब आहे की, राज्यातील बँका १६ दिवस नसून एकूण ८ दिवस बंद राहतील.

महाराष्ट्रातील बँकांच्या ८ सुट्ट्यांचे वेळापत्रक:

०२ ऑक्टोबर (शुक्रवार): महात्मा गांधी जयंती (देशभरात सुट्टी)

Tata nexon

०४ ऑक्टोबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी

१० ऑक्टोबर (दुसरा शनिवार): नियमित बँक सुट्टी

११ ऑक्टोबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी

१८ ऑक्टोबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी

२० ऑक्टोबर (मंगळवार): दसरा / विजयादशमी (महाराष्ट्रासह बहुतांश राज्यांत सुट्टी)

२४ ऑक्टोबर (चौथा शनिवार): नियमित बँक सुट्टी

२५ ऑक्टोबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी

देशभरातील इतर प्रादेशिक सुट्ट्या (महाराष्ट्रात बँका सुरू राहतील):

इतर राज्यांत महासप्तमी (१७ ऑक्टोबर), दुर्गापूजा/विजयादशमी (१९, २१, २२ आणि २३ ऑक्टोबर), लक्ष्मी पूजा (२६ ऑक्टोबर), करवाचौथ (२९ ऑक्टोबर) आणि सरदार पटेल जयंती (३१ ऑक्टोबर) या स्थानिक सणांमुळे बँका बंद राहतील.

ऑनलाइन व डिजिटल सेवा सुरळीत राहणार:

बँक शाखांचे कामकाज प्रत्यक्ष बंद असले तरी ग्राहकांसाठी UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि ATM सेवा २४ तास चालू राहतील. तसेच, RBI च्या नियमांनुसार RTGS आणि NEFT द्वारे होणारे ऑनलाईन व्यवहार वर्षभरात कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही सुरळीतपणे पार पाडता येतील.