Pawss Swami Swaroopanand Janmotsav: पावस स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव सोहळा ३० डिसेंबरपासून; १५ डिसेंबरला तारखेप्रमाणे जन्मोत्सव

Pawss Swami Swaroopanand Janmotsav: पावस स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव सोहळा ३० डिसेंबरपासून; १५ डिसेंबरला तारखेप्रमाणे जन्मोत्सव

Pawss Swami Swaroopanand Janmotsav निमित्त विविध स्पर्धा, कीर्तन, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; ४ जानेवारी २०२७ रोजी मुख्य सोहळा

Pawss Swami Swaroopanand Janmotsav च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचा १२३ वा जन्मोत्सव सोहळा ३० डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत साजरा होणार आहे. याशिवाय १५ डिसेंबर रोजी स्वामीजींचा तारखेप्रमाणे जन्मोत्सव साजरा केला जाणार असून, या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय उच्च व कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, दुपारी ३ वाजता ह.भ.प. सदानंद ताम्हनकर (पुणे) यांच्या हस्ते समारोप व पारितोषिक वितरण (स्थळ: गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी), सायंकाळी ५.३० वाजता ‘श्री क्षेत्र पावस षण्मासिका’चे प्रकाशन व ह.भ.प. सदानंद ताम्हनकर यांचे कीर्तन (स्थळ: अध्यात्म मंदिर, वरचीआळी, रत्नागिरी) होणार आहे. त्यानंतर २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता बालगट पठण स्पर्धा (स्थळ: बियाणी बालक मंदिर, रत्नागिरी) आणि २७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता बालदिंडी (लक्ष्मीचौक ते अध्यात्म मंदिर, रत्नागिरी) आयोजित करण्यात आली आहे.

Pawss Swami Swaroopanand Janmotsav: मुख्य सोहळा व दैनंदिन कार्यक्रम
मुख्य जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान दररोज सकाळी ७ ते १२ प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्या ग्रंथांचे पठण व रात्री ८.३० वाजता श्री हरिपाठ होईल. मुख्य सोहळा व पुढील उत्सवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

Shanti 3

३० डिसेंबर २०२६: सायंकाळी ४ वाजता ‘अमृतधारा बरसती मधुरा’ (डॉ. अतुल दीक्षित) आणि ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता संजीवनी गाथा अभंग गायन स्पर्धा अंतिम फेरी होणार आहे.

१ ते ३ जानेवारी २०२७: १ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता कै. र. वा. तथा भाऊराव देसाई स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. प्राजक्ता वझे (पुणे) यांचे कीर्तन; २ जानेवारीला दुपारी ३ वाजता अवधूत गांधी (आळंदी) यांचे अभंग गायन; तर ३ जानेवारीला पहाटे ४.३० ते सकाळी ९.३० रत्नागिरी ते पावस पायी दिंडी, सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. महेशबुवा नरहर सरदेसाई यांचे कीर्तन आणि रात्री ८.३० वाजता ‘नमो ज्ञानदेवा’ सांगीतिक अनुभूती (सायली गोडबोले-जोशी, पुणे) असे कार्यक्रम होतील.

४ जानेवारी २०२७ (मुख्य जन्मोत्सव दिन): पहाटे ३ वाजता काकड आरती, ४ वाजता समृद्ध पूजा, ६ वाजता आरती व गावातील प्रमुख देवस्थानी पूजा व मंत्राभिषेक, सकाळी ९ वाजता अनंत निवास ते श्रीस्वामी मंदिर मुख्य दिंडी, १० वाजता आरतीनंतर महाप्रसाद, सकाळी ११ ते दुपारी २.४० विविध सांस्कृतिक कार्यक्रम (कथक नृत्य – डॉ. निवेदिता भदाणे, स्वामीजींच्या आठवणी – रवींद्र देवधर, हार्मोनियम वादन – ओजस करकरे, गजर स्वामींचा – प्रवीण कुबडे, उत्तरेश्वर भजनी मंडळ कोल्हापूर), दुपारी ३ वाजता वक्तृत्व स्पर्धा सादरीकरण व पारितोषिक वितरण, ३.३० वाजता लेझीम पथक – साईगणेश, सांगरूळ, सायंकाळी ४.३० वाजता ह.भ.प. अवधूतबुवा टाकळीकर यांचे जन्माचे कीर्तन आणि रात्री ९ वाजता पंडित संजीव अभ्यंकर (पुणे) यांचे अभंग गायन होऊन जन्मोत्सवाची सांगता होईल.

पुढील उत्सव: गुरू श्री गणेश नाथ यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त ६ ते १२ जानेवारी या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ सहस्रावर्तने व श्रीमद् भागवत भक्त कथा (प.पू. स्वामी मधुसूदन महाराज), तसेच १३ ते २० जानेवारी दरम्यान प.पू. गणेशनाथ महाराज पुण्यतिथी उत्सव आणि श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह होणार आहे.