Dnyanbhakti Swarshakti Chiplun: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त चिपळूणात ‘ज्ञानभक्ती स्वरशक्ती’ सोहळ्याचे आयोजन

Dnyanbhakti Swarshakti Chiplun: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त चिपळूणात 'ज्ञानभक्ती स्वरशक्ती' सोहळ्याचे आयोजन

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम; सोहळ्यात २ ऑक्टोबरला लोकसंस्कृतीचा रंगणार जागर

Dnyanbhakti Swarshakti Chiplun उपक्रमांतर्गत कोकणातील सांस्कृतिक वैभवाचा आणि ज्ञानेश्वरीच्या विचारांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी चिपळूणकरांना मिळणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘ज्ञानभक्ती स्वरशक्ती’ या लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वैभव सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी चिपळूण येथे करण्यात आले आहे.

हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडणार आहे. संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा प्रसार करणे आणि महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा जपणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. चिपळूण आणि परिसरातील सर्व कला व संगीत रसिकांसाठी या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे.

या सोहळ्यात निवेदक पंकज विष्णू आणि निवेदिका रश्मी आमडेकर आपल्या निवेदनातून गप्पा आणि विचारांची गुंफण घालतील. तसेच सुप्रसिद्ध गायक मृण्मयी फाटक आणि ओंकार बंडबे यांच्या स्वरांनी ही मैफल रंगणार आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे प्रतीक असलेले भारूड ऋतुराज फडके आणि ओंकार बंडबे सादर करतील. याशिवाय मयुरा पालांडे, संजना पाटील आणि भाग्यश्री दळवी यांच्या बहारदार नृत्याचे सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Khabardar diwali fest

संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष सोहळ्याच्या माध्यमातून भक्ती, संगीत आणि नृत्याचा अद्भुत अविष्कार चिपळूणमध्ये घडणार आहे. या सांस्कृतिक सोहळ्याला चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे निमंत्रण व आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.