Nushrratt Bharuccha Accident: बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा बालीत भीषण अपघात; मणक्याला गंभीर दुखापत, एअर ॲम्बुलन्सने मुंबईत आणणार

Nushrratt Bharuccha Accident: बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा बालीत भीषण अपघात; मणक्याला गंभीर दुखापत, एअर ॲम्बुलन्सने मुंबईत आणणार

शूटिंगदरम्यान पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर; मुंबईत पार पडणार शस्त्रक्रिया

Nushrratt Bharuccha Accident मुळे बॉलिवूडसह तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा इंडोनेशियातील बाली येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिच्या पाठीच्या मणक्याला (Spine Fracture) गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर तातडीने पुढील उपचारांसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नुसरत भरुचा एका व्यावसायिक प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी बाली येथे गेली होती. काम पूर्ण झाल्यानंतर तिने तिथे काही दिवस व्हेकेशनचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यादरम्यान झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेनंतर तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तिच्या टीम आणि प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मणक्याच्या गंभीर दुखापतीवर शस्त्रक्रियेची गरज असल्याने तिला बाली येथून एअर ॲम्बुलन्सद्वारे (Air Ambulance) मुंबईत हलवण्याची तयारी सुरू आहे. मुंबईत आल्यानंतर तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

Aayurzil

‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली नुसरत आगामी काळात ‘घुसखोर पंडित’, ‘बन टिक्की’ आणि टायगर श्रॉफसोबतच्या एका बिग बजेट सिनेमात दिसणार आहे. तिच्या अपघाताची बातमी समजताच चित्रपट सृष्टीतून आणि चाहत्यांकडून ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.