Ratnagiri Police Action: साळवी स्टॉप परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या तरुणावर शहर पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

Ratnagiri Police Action: साळवी स्टॉप परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या तरुणावर शहर पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल

रत्नागिरी शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर पोलिसांची कठोर कारवाई सत्र सुरूच आहे. नुकतीच शहरातील साळवी स्टॉप परिसरातील एका वाईन शॉपसमोर आणि जलतरण तलावाच्या भिंतीजवळ कारवाई करत एका तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. साळवी स्टॉप येथील एका वाईन शॉपसमोरील जलतरण तलावाच्या भिंतीजवळील आडोशाला एक तरुण उघड्यावर मद्यप्राशन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी पाहणी करून पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली.

संशयिताची माहिती व पोलिसांनी केलेली कारवाई
या प्रकरणी आकाश मोहन गोसावी (वय २९, मूळ रा. सांगली, सध्या रा. घुडेवठार झोपडपट्टी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार ईशिता वाडावे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे संशयिताविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

Swami swaru. Pat.