Ratnagiri Tourism News: रत्नागिरीतील पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल; दिवाळीनिमित्त पर्यटकांचा महापूर

Ratnagiri Tourism News: रत्नागिरीतील पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल; दिवाळीनिमित्त पर्यटकांचा महापूर

रत्नागिरीसह गणपतीपुळे, दापोली आणि गुहागरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी; लॉज, हॉटेल आणि होम स्टे व्यवसाय तेजीत

Ratnagiri Tourism News बाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली येथून लाखांच्या संख्येने पर्यटक दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी व दिवाळी साजरी करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील लॉज, हॉटेल्स, होम-स्टे आणि रिसॉर्ट जवळपास हाऊसफुल्ल झाले आहेत. भाट्ये, मांडवी, आरेवारे, गणपतीपुळे, दापोली व गुहागर येथील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्याने पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील पर्यटकही कोकणाला पसंती देत आहेत.

रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस, मांडवी बीच, भाट्ये बीच, शिवसृष्टी, भगवती किल्ला यासह विविध ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. कोकणात आलेले पर्यटक स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्ग, मंदिरे आणि कोकणी जेवणाचा मनमुराद आनंद घेत आहेत. दापोलीतील हर्णे समुद्रकिनारा, लाडघर, कर्दे, मुरुड, केळशी बीचवर पर्यटकांची गर्दी असून, तरुणाईचा मोठा वावर पाहायला मिळत आहे. तसेच गुहागरच्या वेळणेश्वर, हेदवी, बामणघळ, लांजा येथील कोरनिनको धरण आणि राजापूरतील प्राचीन मंदिरांना पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

Ratnagiri Tourism News: व्यावसायिकांना सुगीचे दिवस; स्थानिक बाजारपेठेत उलाढाल
गेल्या दोन वर्षांनंतर दिवाळीत अशी मोठी गर्दी झाल्याने हॉटेल, लॉज आणि होम-स्टे व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. अनेक ठिकाणी पुढील तीन-चार दिवसांसाठी रुम बुकिंग फुल्ल झाले आहे. पर्यटकांकडून खाद्यपदार्थ, मासे, कोकणी मेवा आणि आंबा उत्पादनांना मोठी मागणी असून, स्थानिक मच्छी मार्केटसह इतर बाजारपेठांमध्ये चांगली आर्थिक उलाढाल होत आहे.

Swami swaru. Pat.

रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत; मुख्य मार्गांवर वाहनांच्या रांगा
पर्यटकांच्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे मुंबई-गोवा महामार्गावर तसेच गणपतीपुळे, दापोली आणि गुहागर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी शहरातील माळनाका, मारुती मंदिर आणि एसटी स्टँड परिसरात वाहनांची कोंडी होत असून पर्यटकांना पार्किंगसाठी वणवण भटकावे लागत आहे. स्थानिक पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.