शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुहागरवासीय आणि पर्यटक एकत्र; माजी सैनिकांसह मान्यवरांची उपस्थिती
Guhagar Ek Diwa Shahidansathi बाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यांत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासह सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या आणि कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुहागर येथील शिवतेज फाऊंडेशनतर्फे ‘एक दिवा शहिदांसाठी’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
केवळ दूरचित्रवाणी किंवा वर्तमानपत्रांतील बातम्या पाहून हळहळ व्यक्त न करता जवानांविषयी कृतज्ञता प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. कोणतेही राजकीय अथवा सामाजिक अभिनिवेश न ठेवता सर्व गुहागरवासीय या उपक्रमात एकत्र येतात. यंदाही शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे पर्यटनासाठी गुहागरमध्ये आलेल्या पर्यटकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत शूर जवानांबाबत आदर व्यक्त केला.
Guhagar Ek Diwa Shahidansathi: मान्यवर आणि नागरिकांची मोठी उपस्थिती
या भावूक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते:

निवृत्त माजी सैनिक प्रताप शिर्के
गुहागरच्या नगराध्यक्षा नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल आणि माजी नगराध्यक्षा स्नेहा वरंडे
पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष मनीष खरे
गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर व ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाच्या सीमा बेहनजी
शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, नीलेश गोयथळे, शैलेंद्र खातू, निखिल तांबट, सचिन मुसळे, डॉ. अनिकेत गोळे, संतोष वरंडे, गणेश धनावडे, विकास मालप, सुधाकर कांबळे, प्रभुनाथ देवळेकर, श्रद्धा घाडे, ॲड. सुप्रिया वाघधरे, सारिका कनगुटकर, शीतल साळवी आदी मान्यवर आणि नागरिक













