Sangameshwar News: निवळी परिसरात मध्यरात्री नव्या होंडा युनिकॉर्न दुचाकीला आग; वाहन जळून खाक

Sangameshwar News: निवळी परिसरात मध्यरात्री नव्या होंडा युनिकॉर्न दुचाकीला आग; वाहन जळून खाक

अवघ्या काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या दुचाकीच्या जळीत प्रकरणाचा तपास सुरू

Bike Fire in Sangameshwar तालुक्यातील नायरी-निवळी परिसरात मध्यरात्री उभी ठेवलेल्या नव्या होंडा युनिकॉर्न दुचाकीला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निवळी येथील भरत घडशी यांच्या मालकीची ही दुचाकी असून, घटनेची माहिती २३ नोव्हेंबर रोजी सकाळी संगमेश्वर पोलिसांना देण्यात आली आहे.

मिळालेल्या तपशीलानुसार, निवळी येथील रहिवासी भरत घडशी यांनी आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या पाखाडीजवळ नेहमीप्रमाणे होंडा युनिकॉर्न (MH०८ BL ३४५२) ही दुचाकी उभी केली होती. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परिसरातील एका वृद्ध महिलेला दुचाकीने पेट घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ आवाज देऊन शेजाऱ्यांना जागे केले आणि घटनेची माहिती दिली.

आगीची माहिती समजताच काही ग्रामस्थांनी भरत घडशी यांना उठवण्यासाठी धाव घेतली, तर इतरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका आणि वेग इतका तीव्र होता की स्थानिकांचे प्रयत्न अपुरे पडले आणि काही वेळातच दुचाकी पूर्णपणे भस्मसात झाली.

Anant hights

Bike Fire in Sangameshwar: नव्या कोऱ्या दुचाकीच्या जळीतामुळे विविध तर्कवितर्क
भरत घडशी यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजीच ही दुचाकी खरेदी केली होती. अवघ्या काही महिन्यांतच नव्या दुचाकीची अशी अवस्था झाल्याने निवळी आणि देवरूख परिसरात या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

प्राथमिक तर्कानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली की त्यामागे अन्य कोणते कारण आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

ही आग अपघाताने लागली की कोणी जाणीवपूर्वक लावली, या दोन्ही पैलूंनी विचार केला जात असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी भरत घडशी यांनी या प्रकाराची माहिती संगमेश्वर पोलिसांना दिल्यानंतर आता पोलिसांच्या तपासातूनच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.