Sangmeshwar News: कोंडगाव तिठ्यावर साखरपा पोलिसांची कारवाई; गुरांची अवैध वाहतूक करणारी पिकअप पकडली

Sangmeshwar News: कोंडगाव तिठ्यावर साखरपा पोलिसांची कारवाई; गुरांची अवैध वाहतूक करणारी पिकअप पकडली

गस्तीदरम्यान वाहनाची तपासणी; २५ हजार रुपयांची गुरे व पिकअप जप्त

Cattle Transport Case च्या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे गस्त घालत असताना गुरांची अवैध वाहतूक करणारी गाडी साखरपा पोलिसांनी पकडली आहे. ही कारवाई २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली असून, या प्रकरणी संबंधित वाहनासह गुरे ताब्यात घेऊन साखरपा पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपती सावंत (वय ३९, रा. येळाने, ता. शाहूवाडी) हा आपल्या ताब्यातील एम एच ०७ पी ३६१६ क्रमांकाच्या पिकअपमधून २५ हजार रुपये किमतीची गुरे घेऊन मुंडे तर्फे सावर्डे येथून येळाने (ता. शाहूवाडी) कडे जात होता.

दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव तिठ्यावर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजित पाटील गस्त घालत असताना ही पिकअप त्यांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी संशयावरून वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यातून गुरांची अवैध वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले.

Yash siddhi2

Cattle Transport Case: वाहनासह गुरे ताब्यात; पुढील तपास सुरू
वाहनाची तपासणी करून अवैध वाहतूक निष्पन्न झाल्यानंतर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर यांनी पिकअप गाडीसह गुरे ताब्यात घेतली. त्यानंतर ही कारवाई साखरपा पोलीस दूरक्षेत्रात आणून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव करीत आहेत. वाहतूक परवाना, वाहनाची नोंदणी आणि गुरांच्या वाहतुकीमागचा नेमका उद्देश याबाबत पुढील तपासात अधिक स्पष्टता येणार आहे.