गावणवाडीतील युवक, महिला व पुरुषांचे दिवसभर कष्ट; कोतवडे ग्रुप ग्रामपंचायतीकडून साहित्य उपलब्ध
Kotawade Check Dam Ratnagiri तालुक्यातील कोतवडे गावातील गावणवाडीतील ग्रामस्थांनी राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रमदानातून उभारला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे गावातून वाहणाऱ्या कुसुम नदीवर हा बंधारा बांधण्यात आला असून, पाणीटंचाईच्या काळात हा जलसाठा ग्रामस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
वाडीतील युवक, महिला आणि पुरुषांनी २३ नोव्हेंबर रोजी दिवसभर एकत्र येऊन कष्ट घेत या बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास नेले. लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाचे हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
Kotawade Check Dam Ratnagiri: ग्रामपंचायतीचे सहकार्य आणि अन्य वाड्यांचाही पुढाकार
बंधारा उभारणीसाठी कोतवडे ग्रुप ग्रामपंचायतीकडून आवश्यक यंत्रसामग्री आणि पोती आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामस्थांचे श्रमदान आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी झाला आहे.

कोतवडे गावातील अन्य वाड्यांमधील ग्रामस्थांनीही कुसुम नदीवर बंधारे बांधले आहेत. राज्यातील दुष्काळग्रस्त स्थिती लक्षात घेता, या बंधाऱ्यांमध्ये साठणारे पाणी आगामी काळात ग्रामस्थांच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी मोठे उपयोगी ठरणार आहे.













