Ratnagiri News: रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा अवैध व्यवसाय केल्याप्रकरणी रत्नागिरीतील व्यक्तीला पाच हजार रुपये दंड

Ratnagiri News: रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा अवैध व्यवसाय केल्याप्रकरणी रत्नागिरीतील व्यक्तीला पाच हजार रुपये दंड

Railway Ticket Tout प्रकरणी खेडशी येथील आरोपीने न्यायालयात गुन्हा केला कबूल; दंड न भरल्यास दहा दिवसांची साधी कैद

रत्नागिरी : Railway Ticket Tout (रेल्वे तिकीट दलाली) प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडशी येथील चंद्रकांत अशोक देशमुख (वय ४१) याला मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रेल्वे प्रवासासाठी आरक्षित जागा मिळवून देणे किंवा आरक्षणाच्या तिकिटांची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून प्रवाशांची गरज व हतबलतेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने ही कठोर कारवाई केली आहे. दंडाची रक्कम भरण्यात कसूर केल्यास संबंधित आरोपीला दहा दिवसांची साधी कैद भोगावी लागणार आहे.

रेल्वे सुरक्षा बल (RPF), रत्नागिरी यांनी या प्रकरणी कारवाई केली होती. २२ जून २०२६ रोजी रेल्वे प्रवासासाठी आरक्षित जागा मिळवून देणे अथवा रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची खरेदी-विक्री करण्याचा बेकायदेशीर व्यवसाय केल्याचा आरोप देशमुख याच्यावर ठेवण्यात आला होता. या आधारे भारतीय रेल्वे अधिनियमाच्या कलम १४३(१)(अ) अन्वये त्याच्याविरुद्ध संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक १७८/२०२६ दाखल करण्यात आला होता.

Railway Ticket Tout खटल्यात न्यायालयातील सुनावणी आणि आरोपीची विनंती
न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपीला खटल्याच्या कागदपत्रांच्या प्रती मिळाल्याची खात्री करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्यावरील आरोप समजावून सांगण्यात आले. आरोप समजल्यानंतर आरोपीने गुन्हा स्वेच्छेने कबूल केला.

Shanti 3

यापूर्वी कोणताही गुन्हा केल्याचे आपल्याविरुद्ध सिद्ध झालेले नसून हा आपला पहिलाच गुन्हा आहे, तसेच गुन्ह्याचे स्वरूप किरकोळ असल्याचे नमूद करत आरोपीने कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानंतर न्यायालयाने पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.