लांजा तालुक्यात सर्वाधिक १,२६१ बंधारे, तर मंडणगडमध्ये सर्वात कमी ३९९ बंधाऱ्यांची उभारणी
रत्नागिरी : Ratnagiri Check Dams (रत्नागिरी बंधारे मोहीम) अंतर्गत यंदा पाऊस कमी झाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ७ हजार २०० (एकूण ७,१९२) बंधारे पूर्ण करण्यात आले असून, त्यामुळे लाखो लिटर पाणी अडवण्यास मदत झाली आहे. यामध्ये सर्वाधिक बंधारे लांजा तालुक्यात (१,२६१) तर सर्वात कमी मंडणगड तालुक्यात (३९९) बांधण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला डोंगराळ आणि उताराचा भूभाग लाभल्यामुळे पावसाचे पाणी वेगाने वाहून समुद्राला जाऊन मिळते. परिणामी, पावसाळा संपताच अनेक गावांमध्ये विहिरींची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात होते आणि दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतींमध्ये एकूण १२ हजार ६९५ बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत २ हजार ५९७ कच्चे बंधारे, १ हजार २८७ वनराई बंधारे आणि ३ हजार ३१८ विजय बंधारे उभारण्यात आले आहेत.
Ratnagiri Check Dams: लोकसहभाग आणि तालुकानिहाय बंधाऱ्यांची आकडेवारी
या मोहिमेत शेतकरी, ग्रामस्थ, ग्रामपंचायती, बचत गट, शाळा, महाविद्यालये, तरुण मंडळे तसेच शासकीय यंत्रणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावागावांतील नाले, ओढे आणि छोट्या प्रवाहांवर श्रमदानातून बंधारे उभारले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय उभारलेल्या बंधाऱ्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

तालुका एकूण बंधारे
चिपळूण १०६१
दापोली १०२५
गुहागर ५०८
खेड ५३८
लांजा १२६१
मंडणगड ३९९
राजापूर १०७४
रत्नागिरी ६०८
संगमेश्वर ७८५
एकूण ७,१९२













