गुहागरमध्ये आ. भास्कर जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ

गुहागर : महाविकास आघाडीचे (उबाठा) शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागरमधील प्रचाराचा प्रारंभ ग्रामदेवता श्री देवी व्याघ्रांबरी देवीचा आशीर्वाद घेऊन करण्यात आला.

गुहागरमधील प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी प्रचारप्रमुख शिवसेना उबाठा शहरप्रमुख सिद्धिविनायक जाधव, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, राजेंद्र आरेकर, बाबा देवळेकर, महिला संघटिका सारिका कनगुटकर, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, पारिजात कांबळे, शाखाप्रमुख कल्पेश बागकर, संजय पवार, डी. पी. गुरव, शशिकांत शिंदे, सुहास गुहागरकर, अनिकेत भोसले, पराग मोरे, युवासेना शहरप्रमुख राज विखारे, सोहम सातार्डेकर, सुजय होळम, विनोद कदम, प्रसाद भागडे आदी युवा सैनिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 13/Nov/2024