राजापूर : धाऊलवल्ली खाडीतील कांदळवन तोडल्याप्रकरणी कारवाईची मागणी

नाटे : राजापूर तालुक्यातील मौजे धाऊलवल्ली कांदळवनाची तोड केल्याप्रकरणी कारवाईची मागणी रूपेंद्र विलास कोठारकर यांनी वन विभागाकडे केली आहे. राजापूर तालुक्यातील मौजे धाऊलवल्ली येथील भूमापन क्र. ११३/११ मधील क्षेत्र १.४५.०० मध्ये विनायक रमन बांदकर (नाटे, बांदचा वाडा, राजापूर) यांनी खाडीलगत असलेली कांदळवनची झाडे सुमारे सहा महिन्यांपूर्वी तोडली आहेत. याबाबत वनपाल राजापूर, वन विभाग राजापूर यांनी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम आणि कांदळवन विभाग अधिनियम यांचा आधारे चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे लेखी पत्र रुपेंद्र विलास कोठारकर धाऊलवल्ली यांनी राजापूर वन विभागाला दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 25/Sep/2024