प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर च्या नवीन निवास स्थान कामाचे ऑक्टोबर मध्ये भूमिपूजन

ठेका स्वामी इन्फ्रास्ट्रक्चर कडे, ५४७ दिवसात काम पूर्ण करण्याचे आदेश

राजापूर : राजापूर मधील प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापुर साठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य विभाग च्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य विभाग जैतापूर, तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी नवीन प्राथमिक केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम करणे यासाठी तब्बल ४ कोटी ६२ लाख निधी मंजूर झाला आहे.

कित्येक वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी निवास च्या इमारत राहण्या योग्य नसल्याने येथे डॉक्टर, परिचालीका, आणि इतर कर्मचारी वर्ग हे या केंद्राच्या बाहेर वास्तव करीत होते. आणि रात्री अपरात्री रुग्णालयात कोण नसल्याने रुग्णांचे हाल होत होते. विभागीय जनतेने वारंवार निवासी परिचालीका आणि डॉक्टर यांची मागणी करूनही इमारती ची दुरवस्था असलेने येथे कोणीही राहू शकत नव्हते. रात्री च्या वेळेस गरोदर महिलांच्या बाबतीत सुद्धा निवासी परिचालीका नसलेल्याने ही समस्या होतीच. या साठी राजापूर लांजा साखरपा चे आमदार राजन जी सळवी यांच्या प्रयत्नाने, त्याचप्रमाणे माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र चे सचिव समिर शिरवडकर यांनी वारंवार जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी आठले यांच्याकडे सततच्या पाठपुरव्याला यश येऊन लवकरचं लोकांच्या सेवेसाठी सज्ज होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 25/Sep/2024