रत्नागिरी : रत्नागिरीचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी, तृणबिंदुकेश्वर मंदिरामध्ये कालभैरव जयंती धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.
मंदिरात सकाळी गावाच्या वतीने अभिषक, होमहवन, सत्यनारायण महापूजा, आरती, असे धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच कालभैरवाष्टक पठण, दुपारी महाप्रसाद झाला. त्यानंतर वेळेत श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ (भांडूप), श्री स्वामी समर्थ भजन मंडळ (केळ्ये) यांची भजने झाली.
सायंकाळी कालभैरव जयंतीनिमित्त कीर्तन सादर झाले. त्यानंतर श्री दुर्गामाता महिला भजन मंडळ (कर्ला), जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ (कोतवडे), श्री दत्तगुरू सेवा मंडळ (रत्नागिरी), दत्तप्रासादिक भजन मंडळ (घुडेवठार) यांची सुश्राव्य भजने सादर झाली. रात्री १२ वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 25/Nov/2024