खेड : शहरासाठी आमदार योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने ४३ कोटी रुपयांच्या प्रस्तावित नवीन नळपाणी योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. पुढील आठवड्यात आमदार योगेश कदम व अधिकारी यांच्यात महत्वपूर्ण बैठकही होणार आहे. या बैठकीनंतर नव्या नळपाणी योजनेच्या कामास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शहराला भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.
खेड शहराला भेडसावणारी पाणीसमस्या ३० वर्षांपूर्वीच्या जुन्या नळपाणी योजनेतील जलवाहिनीमुळे निर्माण झाली आहे. यामुळे शहरवासियांना पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. काही भागात दिवसातून एकच वेळ नळाला पाणी येत असल्याने प्रसंगी नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. काही भागात नगर प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. कमी दाबाच्या पाणीसमस्या कायम असल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणून दिलासा देण्यासाठी आमदार योगेश कदम यांचे निधीसाठी साकडे होते. नव्या नळपाणी योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार शहरासाठी ४३ कोटी रुपयांची नवी नळपाणी योजना मंजूर झाल्याने नेहमी सतावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. यी सध्या नळपाणी योजनेच्या कामासदेखील लवकरच प्रारंभ होणार आहे. आमदार योगेश कदम यांनी पुढील आठवडयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीत सखोल चर्चा करण्यात येणार आहे. जलवाहिनी टाकण्याच्या कामात रस्तेकामाचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यालादेखील बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. प्रत्यक्षात नळपाणी योजनेचे कामदेखील हाती घेण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 26/Sep/2024