राजापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील राजापूर विधानसभा मतदारसंघातील दोन केंद्रांवरील ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याची मागणी माजी आमदार राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
राजापूर मतदारसंघाच्या निकालाबाबत संशय असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्षेप नोंदविला असल्याची माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजन साळवी यानी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या २६ एप्रिल २०२४ च्या आदेशानुसार निवडणूक निकाल लागल्यानंतर ७ दिवसांच्या आतमध्ये अशा पडताळणीची मागणी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार करू शकतात. निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याने मतदान केंद्र क्रमांक २ चाफवली आणि २०० तुळसवडे येथील यंत्रांची पडताळणी करून निर्माण झालेला संशय दूर करावा, असे श्री. साळवी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 30-11-2024