रत्नागिरी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ”वन नेशन, वन स्टुडंट आयडी” योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामध्ये प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी (अपार कार्ड) दिले जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या कार्डच्या माध्यमातून नवी ओळख मिळणार आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची संपूर्ण माहिती या ओळखपत्रात असणार आहे.
”अपार कार्ड” ही विद्यार्थ्यांसाठी नवीन ओळख देणारी प्रणाली आहे. त्यामध्ये या विद्यार्थ्यांना बारा अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे. संबंधित क्रमांक त्या विद्यार्थ्यांची ओळख असेल. या क्रमांकावर असेलल्या कार्डमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक नोंदीचा समवेश असणार आहे. शिक्षण विभागाकडून या कार्डची नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची कटकट दूर होणार आहे.
नोकरीसाठी फायदेशीर
नोकरीसाठी विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. या कार्डच्या माध्यमातून ओळख निर्माण होणार आहे. असलेल्या कार्डमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक नोंदीचा समावेश असेल. शिक्षण विभागाकडून या कार्डसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
काय आहे ‘अपार’?
अपार कार्ड ही एज्युलॉकरसारखे असणार आहे. त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध असणार आहे. या कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, पत्ता, त्याची शाळा, महाविद्यालय, इयत्ता, त्याचा निकाल, शिष्यवृत्ती याबाबत माहिती उपलब्ध असणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:42 30-11-2024