मुंबई : राज्यात कुणबी नोंदीच्या आधारे मराठा प्रमाणपत्र मिळवण्यात नाशिक आणि मराठवाड्याने बाजी मारली आहे. मागील जवळपास ११ महिन्यांत राज्यात सहा लाख कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. नाशिक विभागात १ लाख ९२ हजार ८६ तर मराठवाड्यात तब्बल १ लाख ६१ हजार ६९४ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. सर्वात कमी ४६ हजार ६४ कुणबी नोंदी मराठवाड्यात सापडल्या असल्या तरी कुणबी प्रमाणपत्रांचे मोठ्या प्रमाणावर वाटप मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये करण्यात आले आहे. यात बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १ लाख ४ हजार ३७० प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे सरकारी पातळीवर अनेकदा अर्ज फेटाळण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. चावेळी मात्र संपूर्ण राज्यात ६ लाख २७ हजार ९५३ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तर १६ हजार ५०४ अर्ज प्रलंबित आहेत. फेटाळलेल्या अर्जाची संख्या २ हजार १८९ इतकी आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ११ हजार ४७ अर्ब आले, त्यापैकी १ लाख ४ हजार ३७० जणांना कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. कोकण विभागात सर्वात कमी ४४ हजार ४८३ अर्ज प्राप्त झाले त्यापैकी ४४ हजार १६७ जात प्रमाणपत्राचे वाटप करणात आले आहे. राज्यात गेले वर्षभर धुमसणाऱ्या मराठा आंदोलनानंतर कुणबी नोंदी शोधून त्या नोंदींच्या आधारे मराठा समाजाता कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहेत, मराठवाडयाप्रमाणेच संपूर्ण राज्यात मराठा समाजाला ही प्रमाणपत्रे देता यावीत, यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी माजी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. शिंदे समितीला राज्यभरात ५८ लाख ७७ हजार ९९३ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या सर्व नोदी प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यात सर्वात कमी तर नागपूर विभागात ९ लाख ४ हजार ९७६ कुणबी नोंदी सापडल्या आहेत, विदर्भ आणि कोकण विभागात कुणबी जात प्रमाणपत्र घेणाऱ्यांचे प्रमाण यापूर्वीच जास्त असल्याने नव्याने कुणबी प्रमाणपत्रांसाठी फार अर्ज आलेले नाहीत. कोकण विभागामध्ये ४४ हजार १६७ जणांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. मुंबई शहरात २४०, मुंबई उपनगरात २९ जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत.
नाशिक विभागात ८ लाख २७ हजार कुणबी नोंदी सापडल्या. त्याआधारे १ लाख ९८ हजार जणांनी कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केले, त्यापैकी आतापर्यंत १ लाख ९२ हजार ८६ जणांना जात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
शिंदे समितीमुळे मराठवाड्याला फायदा
मराठवाड्यामध्ये निजामकालीन दस्तऐवज तपासले गेले नसल्याने कुणबी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याची आंदोलकांची ओरड होती. निजामकालीन दस्तऐवज तसेच इतर दस्ताऐवज तपासण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याचे काम शिंदे समितीने केले. याचा फायदा मराठवाडयात मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. मराठवाडयात कुणबी नोंदी कमी सापडल्या असल्या तरी त्याच्या आधारे अनेक जणांना कुणबी जात प्रमाणपत्रे मिळाली आहेत. मराठवाडयात बीडमध्ये सर्वांत जास्त १ लाख ४ हजार ३०० तर सर्वात कमी लातूर जिल्ह्यात १ हजार ९२३ इतक्या कुणबी जात प्रमाणपत्राचे वाटप झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 26/Sep/2024