चिपळूण : जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने शासनाच्या जलसाक्षरता अभियान व चला जाणूया नदीला अभियान अंतर्गत चिपळुणातील पेठमाप वाशिष्ठी नदीकिनारी नदी दिन साजरा करण्यात आला. २२ सप्टेंबर रोजी हा दिन साजरा झाला. ‘वॉटर फॉर ऑल’ हे ब्रीदवाक्य घेऊन यावर्षी नदी दिन साजरा करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता गणेश सलगर, मुख्याधिकारी विशाल भोसले, पाटबंधारे उपविभागीय अभियंता विपुल खोत, न.प.चे प्रसाद साडविलकर, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह, फैरोजा मोडक, स्वाती दांडेकर, सुनील जांभेकर, मुजाहीद मेयर आदी उपस्थित होते.
यावेळी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्लोबलचे राम रेडीज, बापू काणे, अशोक भुस्कुटे, अजित देशपांडे, समीर कोवळे, मंदार चिपळूणकर, दिगंबर सुर्वे, जलदूत शाहनवाज शाह यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:18 PM 26/Sep/2024