संगमेश्वर : दख्खन धनगरवाडीत श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

देवरुख : पंचायत समिती देवरूख ग्रामीण पाणी पुरवठा व बांधकाम विभाग प्रशासन यांच्यावतीने दुर्गम ठिकाणी टंचाईग्रस्त असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडी येथे श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. ग्रामीण पाणी पुरवठा देवरूख उपअभियंता अभिजित कांबळे, देवरूख बांधकाम उपअभियंता शिवपुरे, ग्रामीण पाणी पुरवठा शाखा अभियंता लठाड, शाखा अभियंता गायकवाड यांनी स्वतः दगड, माती, अवजारे हाती घेऊन श्रमदान केले. त्यांच्या साथीला प्रशासनाची टीम उतरली होती. श्रमदानातून दख्खन धनगर वाडी विहिरीलगत वनराई बंधारा बांधला. यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली असून, टंचाई काळात या बंधाऱ्याचा येथील नागरिकांना लाभ होणार आहे. वनराई बंधाऱ्यासाठी दख्खन गावात दाखल झालेल्या टीमचे माजी सरपंच मंगेश दळवी, जान्हवी गुरव, विठोबा फोंडे, ग्रामपंचायत अधिकारी वैभव शिंदे यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 05/Dec/2024