लांजा : रत्नागिरी जिह्यात रक्तपेंढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनानुसार लांजा येथील शिवगंध प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला तब्बल १९१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. लांजा शहरातील संकल्पसिद्धी हॉल येथे हे शिबिर पार पडले. या शिबिरासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, रेडक्रॉस व वालावलकर रुग्णालय डेरवण-चिपळूण यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवगंध प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 05/Dec/2024