रत्नागिरी : विज्ञान प्रदर्शनात करबुडे विद्यालय प्रथम

रत्नागिरी : जिल्हा क्रीडा संचालनालय कार्यालय व नेहरू युवा केंद्रच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

यामध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात करबुडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे वाहनचालकांची झोप उडवणारा चष्मा यास सामूहिक गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला.

रविवारी (ता. १) डिसेंबरला साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात जिल्हास्तरावर युवा महोत्सव झाला. त्यामध्ये युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सांघिक गटात सहभाग नोंदवून विद्यालयाच्या विराज सावंत आणि हर्ष वारिक या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या प्रकल्पाचे सादरीकरण केले आणि जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी त्यांना प्रशालेतील विज्ञानशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेच्यावतीने मुख्याध्यापक महेंद्र कुवलेकर, ज्येष्ठ शिक्षिका प्रियांका चव्हाण, सुरेश पाटोळे, बाहुबली नाईक, गजमल बहिरम, जान्हवी जाधव आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे अभिनंदन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 05-12-2024