रत्नागिरी : मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याने शपथ ग्रहण सोहळ्याच्या वेळी जिल्हा कार्यालय येथे भाजप च्या तिन्ही मंडलाचा जल्लोष…

रत्नागिरी : विधी मंडळ गट नेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होऊन ते आज संयंकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथ ग्रहण सोहळ्याचे आपणही एक भाग व्हावा म्हणून भाजप च्या जिल्हा कार्यलयात शपथ ग्रहण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. त्या सोबत लाडू, पेढे मिठाई वाटप करण्यात येणार असून फाटक्यांची आतिष बाजी करण्यात येणार आहे.

भाजप रत्नागिरी शहर मंडल, रत्नागिरी तालुका दक्षिण व उत्तर मंडल असे तिन्ही मंडलाचा एकत्रित कार्यक्रम भाजप च्या जिल्हा कार्यालयात संपन्न होणार आहे, असे राजन फाळके, दादा दळी, विवेक सुर्वे यांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 05-12-2024