खेड : आंबये येथे १४ डिसेंबरला श्री दत्त जयंती उत्सव

खेड : खेड तालुक्यातील आंबये येथील श्री दत्तगुरु देवस्थान व दत्तवाडी ग्रामस्थ पुणे, ठाणे, मुंबई मंडळ यांच्यावतीने आंबये सकपाळवाडी येथे दत्तजयंती उत्सव १४ डिसेंबर २०२४ रोजी मोठया उत्साहात पार पडणार आहे. तत्पूर्वी गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते ८- श्री दत्तगुरु देवस्थान, दत्तवाडी आंबये आणि जय हनुमान प्रासादिक भजनी मंडळ आंबये सकपाळ यांचा एकत्र हरिपाठ, दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७- दिपोत्सव, सायंकाळी ७ ते ८ – हरिपाठ, रात्री १० ते ११:३० वा. नांदगाव येथील शिव पार्वती भजन मंडळाची सेवा असा कार्यक्रम होणार आहे.

शनिवार १४ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती दिवशी सकाळी ७ ते ९ पूजा, अभिषेक व होमहवन, सकाळी ९ ते ११ ध्वजारोहन, सकाळी ११ ते दुपारी १ दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व अन्य सत्कार कार्यक्रम. दुपारी १ ते २- संगीत खुर्ची, चमचा लिंबू व इतर लहान मुलांच्या स्पर्धा, दुपारी ३ ते ५ गुरुचरित्र वाचन त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत श्री दत्तजन्मकाळ सोहळा पार पडल्यावर सायंकाळी ६:३० ते ७:३०-हरिपाठ, रात्री ७ : ३० ते ८:३० महाप्रसाद, रात्री ८:३० ते ९:३०-सकपाळवाडी दिंडी, रात्री ९:३० ते ११:३०- निरबाडे चिपळूण येथील किर्तन सोबत दिवाणखवटी येथील सोमजाई भजन मंडळ, रात्री ११: ३० ते पहाटे ४ चिपळूण तालुक्यातील कोंढे येथील आई माऊली नाटय मंडळ हे परशुराम कथा या पौराणिक गणासह नव्या सदाबहार तालावर नटलेली गवळण व सुवर्ण राजमुकूट या वगनाट्यासह कोकणची लोककला हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवार दि. १५ डिसेंबर रोजी पहाटे ४ ते ५ सकपाळवाडी व दत्तवाडी यांची एकत्र काकड आरती सोबत श्री दत्तपादुका पालखी प्रदक्षिणा, सकाळी ९ ते ११- श्री सत्यनारायणाची महापूजा, आणि दुपारी ११ ते १ या वेळेत महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या उत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तगुरू देवस्थान, दत्तवाडी, आंबये (ट्रस्ट), पुणे मंडळ, ग्रामस्थ मंडळ, ठाणे- मुंबई मंडळ व महिला आंबये दत्तवाडी व प्रणित सकपाळ यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 05/Dec/2024