चिपळूण : तालुक्यातील शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून एक दिवस रुग्णांसाठी फिजिओथेरपी ओपीडी (आउट गवपेशंट विभाग) सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सेवा अलोरे येथील डॉ. करणकुमार कररा (BPT.MPTH.फिजिओथेरपी, कार्डिओ पलमणारी) तज्ज्ञ यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात येत आहे.
ही सेवा रुग्णांसाठी विशेष उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच गरीब व गरजू नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे. प्राथमिक उपचारांसाठी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 05/Dec/2024