पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरात बेकायदेशीर गुटखा, पान मसाला, आर एम डी बाळगणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी 24 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गुटखा बाळगल्याप्रकरणी व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
बुधवारी पाचल बाजारपेठेत मोठा आठवडा बाजार भरला होता. या वेळी राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचल बाजारपेठेतील बाजारवाडी येथील एका व्यापाऱ्याच्या घरी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान धाड टाकली. त्याच्याकडून 24,175 रुपयाचा माल जप्त केला. यामध्ये चौकीदार गुटखा, आर एम डी. पानमसाला,रॉयल दुबई कॉलेटी गुटखा, केसरयुक्त पानमसाला, तांबाखु, राजनिवास पानमसाला या कंपन्याच्या पाकिटांचा समावेश आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण सह महिला पोलीस सहाय्यक निरीक्षक श्रीम. दिपज्योती पाटील,रायपाटण पोलीस हेड कॉ. कमलाकर तळेकर,पो. कॉ भीम कोळी,पो.कॉ.दीपक काळे, पो.कॉ. गवळी,पो.कॉ. खामकर,पो.कॉ.कदम, चालक पो कॉ. घोगले उपस्थित होते.
या व्यापाऱ्याच्या विरोधात राजापूरात फिर्यादी पो. कॉ. भीम कोळी यांनी राजापूर पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. 161/2024 भारतीय न्यास संहिता 2023 चे कलम 123, 274, 275, 223 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2)(j)26(2)(ii)26(3)(iv)26(2)(e), 30(2)(a) प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 05-12-2024