चिपळूण : नातू महाविद्यालयच्या प्राचार्यपदी डॉ. बाळासाहेब यादव यांची निवड

रामपूर : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी, संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हाने येथे असोसिएट प्रोफेसर डॉ. बाळासाहेब यादव यांची प्राचार्यपदी निवड करण्यात आली. मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष जयसिंगराव मोरे, संचालक अजित साळवी, शशिकांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, भरत देवरुखकर, यशवंत चव्हाण, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापकांनी डॉ. यादव यांचे अभिनंदन केले. डॉ. यादव यांनी आय. सी. एस. महाविद्यालय खेड येथे इंग्रजी विभागप्रमुख म्हणून तीस वर्षे अध्यापन केले आहे. इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक असणाऱ्या डॉ. यादव यांची राष्ट्रीय स्तरावर एक विशेष ओळख आहे. या निवडीबाबत महाविद्यालयाच्या माजी प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता काटकर, उपप्राचार्य अनिल कांबळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी डॉ. यादव यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 06/Dec/2024