रत्नागिरी : बांग्लादेशातील परिस्थितीबाबत हिंदू राष्ट्र समितीचे सरकारला निवेदन

रत्नागिरी : बांग्लादेशात हिंदूंचा छळ होत आहे. तेथील हिंसाचारात लोकांचा मृत्यू झाला आहे. याची गंभीर दखल घेऊन भारत सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन चिपळूणचे प्रांताधिकारी अशोक लिगाडे यांना देण्यात आले.

निवेदन देताना हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक अमित जोशी, श्री. संस्थान भार्गवराम परशुराम देवस्थानचे विश्‍वस्त अभय महाराज सहस्रबुद्धे, युवासेनेचे उपतालुकाध्यक्ष आदित्य जोशी, विक्रम जोशी, सुधीर कदम, टेरव येथील श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई देवस्थानचे चंद्रकांत कदम, अनुराग उतेकर, उमेश गुरव, श्री विंध्यवासिनी देवस्थानचे अध्यक्ष महेश पोंक्षे, प्रशांत परब, सुदेश कांबळी आदी उपस्थित होते. बांग्लादेशातील सत्तापालट झाल्यानंतर तेथील अल्पसंख्याक हिंदू समाजावर धार्मिक अत्याचार केले जात आहेत. तेथे मंदिरे उद्ध्वस्त करणे, हिंदूंच्या संपत्ती बळकावणे, राजरोसपणे हत्या करणे यासारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याची दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 06-12-2024