रत्नागिरी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघात खेड येथील धनंजय झोरे याची निवड झाली आहे.
धनंजय झोरे हा वयाच्या दहा वर्षांपासून खेड येथील प्रशिक्षक कैलास सावंत यांची खेड क्रिकेट अॅकॅडमी यातून क्रिकेटचे धडे घेत होता. विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याची नुकतीच निवड झाली. त्याच्या निवडीबद्दल त्याचे वडील अंकुश झोरे, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण ऊर्फ भैया सामंत, सचिव बिपिन बंदरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी, सहसचिव दीपक देसाई व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 06/Dec/2024