देवरूख : शहरातील शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य कै. द. ज. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ २३ व्या विभागीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात १० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. सकाळी ११ स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११वी आणि १२ वी वर्गातील कोणत्याही शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे. या स्पर्धेत एका महाविद्यालयातील कितीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. कथेचा विषय युद्धकथा (ऐतिहासिक, पौराणिक, जागतिक व भारतीय सैन्य कथा) ठेवण्यात आला आहे. प्रथम क्रमांकास ४ हजार १ रु. व आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक २ हजार ५०१ रु. व आकर्षक चषक आणि प्रमाणपत्रर, तृतीय क्रमांक १ हजार ५०१ रु. व आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 06/Dec/2024