चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथे मंगळवारी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. यामध्ये एकूण १९ जण जखमी झाले असून, चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रेलर चालकावर चिपळूण पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची फिर्याद मनोज महादेव मांजरेकर (३२, राजापूर) यांनी दिली. या अपघातात दिग्विजय पाटील (३७, खेर्डी), भाऊ मेहेर (३१, खेर्डी, विरेश अशोक शिर्के (३८, पोफळी), अनिल खेडेकर (३४, बहादूरशेख नाका), शांताराम खोपडे (५५, चिपळूण), मिलिंद सहस्त्रबुद्धे (६०, बुरबाड- संगमेश्वर), निलेश संपत पडे (२७, खेर्डी), सोमनाथ लोहार (२९, खेर्डी), अरुण पवार (५३, पिंपळी), प्रसाद नलावडे (२८, खेर्डी), सौरभ नवरत (२८, अडरे), मिथिलेश जाधव (३४, सती), परेश दहिवलकर (३१, खेर्डी), अरुण कुमार (४५, खेर्डी), मंगेश गायकवाड (२९, खेर्डी), आनंद गुंजाळ (३५, खेर्डी), दिगंबर नागेश (३१, कळंबस्ते), संकेत जाधव (४०, खेर्डी-शिवाजीनगर), मनोज मांजरेकर (३२, जैतापूर- राजापूर) हे जखमी झाले आहेत.
या अपघातात ट्रेलरसह मालवाहू गाडी, बस व एका कारचेही नुकसान झाले. या अपघातात ट्रेलर चालकही जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 06-12-2024