रत्नागिरी : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनने कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त दिव्यांग मुलांची तपासणी करण्यात आली.
दिव्यांग मुले समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत. त्यांना समाजात वावरताना कोणतीही समस्या येणार नाही व ही मुले सरळसोपी जीवनशैली अंगीकारतील, या हेतूने त्यांच्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. मुकुल माधव विद्यलयाच्या विद्यार्थ्यांबरोबर या मुलांनी संगीत, गायन, चित्रकला अशा विविध करमणुकीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, डॉ. गावडे, शिक्षक, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे अधिकारी उपस्थित होते. गेली ७ वर्षे फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन दिव्यांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र चालवत आहे. जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त दिव्यांग मुलांची तपासणी केली. त्यांना वेळोवेळी न्यूरो सर्जन, आर्थपिडिशियन, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑर्थोटिस्ट्स आणि ऑप्टोमेट्रिस्ट यांनी तपासणी केली, त्याकरिता पुण्यातील संचेती हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर आणि एचव्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या टीमने सहकार्य केले.
यामुळे सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांना उपयोग झाला. या अनुषंगाने एप्रिल २०१७ या सीपी मिशनच्या फिनोलेक्स कॉलनी येथे पुनर्वसन केंद्राची सुरू केले. तेथे दररोज फिजिओथेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट सेवा देतात. कार्यक्रमावेळी पालकांनी मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याबद्दल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी आभार मानले.
कोविडमध्येही विनाखंड मार्गदर्शन
कोविडच्या कालावधीमध्ये सीपी केंद्रातर्फे ऑनलाईन मार्गदर्शन केले. समाजमाध्यमांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. या केंद्रातील मुलांचा वाढदिवस, भारतीय सण साजरे केले जातात. हे केंद्र आज आठव्या वर्षाकडे वाटचाल करत आहे. मुकुल माधव फाउंडेशनने आतापर्यंत ९ हजार ५०० पेक्षा जास्त थेरपी, शस्त्रक्रिया व उपजीविकेकरिता मदत केली आहे. ३०० पेक्षा जास्त शिबिर आयोजित करून ११ पेक्षा जास्त पुनर्वसन केंद्र महाराष्ट्र, गोवा व गुजरात येथे कार्यरत आहेत. ३५ पेक्षा जास्त दिव्यांग संस्थांना पूर्ण भारतभर मुकुल माधव फाउंडेशन वेगवेगळ्या रूपात मदत करत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 06/Dec/2024