रत्नागिरी : दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, असे परंपरा मानते. गीताजयंतीनिमित्त येत्या बुधवारी (ता. ११) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि रत्नागिरीतील गीताप्रेमींनी रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात कार्यक्रम आयोजित केला आहे. यात संपूर्ण गीतापठण कार्यक्रम आणि प्रसिद्ध प्रवचनकार धनंजय चितळे यांचे व्याख्यान होणार आहे.
दुपारी २ वाजता गीतापठण सुरू होणार आहे. यात गीताप्रेमी तसेच विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत. गीतापठणासाठी दुपारी गीतेचे पुस्तक घेऊन उपस्थित राहावे. संध्याकाळी ५ वाजता प्रवचनकार धनंजय चितळे हे ‘श्रीमद्भगवद्गीता महती आणि गीतेचे अभ्यासक’ यावर व्याख्यान देणार आहेत. गोगटे महाविद्यालय, शिर्के प्रशाला, जांभेकर विद्यालय, जीजीपीएस, गोडबोले विद्यामंदिर, पटवर्धन, फाटक प्रशाला गीताप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिल्पा पटवर्धन यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 06/Dec/2024