रत्नागिरी : येथील पर्यावरण संस्था, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि मरीन सिंडीकेट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील नद्या आणि खाड्या यावर सद्यस्थिती, वापर आणि संवर्धन यावर परिसंवाद आयोजित केला आहे. येत्या रविवारी (ता. ८) सकाळी १०:३० वाजता गोगटे महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात परिसंवाद होईल.
यामध्ये डॉ. सुमंत नरसिंगराव पांडे आणि तज्ज्ञ अविनाश निवते हे प्रमुख सहभागी होणार आहेत. डॉ. पांडे यांनी महाराष्ट्र शासनामध्ये तीन दशकांपेक्षा अधिक सेवा दिली आहे. यशदा येथे जलसाक्षरता केंद्र स्थापन करणे यामध्ये योगदान त्याचप्रमाणे, राज्य जलसाक्षरता केंद्राच्या कार्यकारी संचालक या नात्याने कार्यरत होते. नद्या, जलस्त्रोत हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. तसेच जलसाक्षरता लोकांमध्ये रुजविण्यासाठी राज्यात सुमारे चार हजार स्वयंसेवकांची फळी निर्माण करण्यासाठी योगदान दिले आहे. पाणी विषयक अनेक पुस्तके लिहिली आहेत. पुणे जिल्ह्यातील वेळगंगा नदी खोऱ्याचा अभ्यास व उपाय यावर काम केलं आहे. गोदावरी नदी हा अभ्यास, त्यावर लोकसहभागातून उपाययोजनांचा सुरू आहेत. ज जैवविविधतेचा हे ग्रामपंचायतीसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचे कार्यपुस्तक तयार आहे. क्षारपड जमीन अभ्यास आणि उपाय यावर त्यांचे विशेष कार्य आहे. राज्यातील विविध नद्यांच्या गाळमुक्तीसाठी चळवळ राबवली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीचा अभ्यास आणि कोंडी गाळमुक्त करण्यासाठी मागील तीन वर्षापासून प्रयत्न करत आहेत. अविनाश निवते हे अॅग्रीकल्चरल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे. पाणी व सांडपाणी व्यवस्थापनात त्यांचे विशेष योगदान आहे. पर्यावरण जागृती, नैसर्गिक शेती व कंपोस्टिंग, जैवविविधता संवर्धनासाठी ते कार्य करत आहेत. शेतकऱ्यांच्या गटांना मार्गदर्शन करत आहेत. अधिकाधिक नागरिक, विद्यार्थ्यांनी या परिसंवाद कार्यक्रमासाठी यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:53 PM 06/Dec/2024